मुंबई : कोल्हापूर येथील शिवसेनेच्या महाअधिवेशनात खासदार श्रीकांत शिंदे यांनी दमदार भाषण केले. या भाषणात त्यांनी जुन्या अठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत काही किस्से सांगितले. भाषण करतांना श्रीकांत शिंदेंना अश्रू अनावर झाले होते. श्रीकांत शिंदे यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्र्यांना अश्रू अनावर झाले होते.
श्रीकांत शिंदे म्हणाले की, जेव्हा कधी मी कार्यक्रमाला जातो तेव्हा मला विचारतात की, वडील एकनाथ शिंदेंसोबतची आठवण सांगा. पण मला ती सांगता येत नाही. कारण मी कायम त्यांना शिवसैनिकांसोबतच पाहिले, आमच्यासोबत कधीही पाहिले नाही. मी म्हणायचो आम्हाला कधी वेळ देणार पण ते देऊ शकले नाहीत, असं म्हणत श्रीकांत शिंदेंना अश्रू अनावर झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या डोळ्यातही पाणी आले.
पुढे बोलतांना श्रीकांत शिंदे म्हणाले की, कोल्हापूरचा पूर असेल, इर्शाळवाडीची घटना असेल, कोकणातला पूर असेल कोणतीही घटना घडली की सगळ्यात आधी धावून जाणारा कोणी शिवसैनिक असेल तर ते एकनाथ शिंदे हे आहेत, असं श्रीकांत शिंदे म्हणाले. धर्मवीर आनंद दिघेंनी वयाच्या १६-१७व्या वर्षी शाखाप्रमुख केलं. शाखाप्रमुख झाल्यापासून एकनाथ शिंदेंनी कधी मागे वळून पाहिलं नाही, असं श्रीकांत शिंदेंनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, किसन नगरच्या दहा बाय दहाच्या एकत्रित कुटूंबातून सुरू झालेला माझा प्रवास अथक प्रयत्न आणि परिश्रमाने राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत कसा येऊन पोहोचला ते श्रीकांतने आपल्या भाषणातून अगदी समर्पक शब्दात मांडल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले. शिवसेना हेच माझं सर्वस्व होतं, शिवसैनिक हेच माझं कुटूंब होतं. आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केलं पुढे काय होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती नेहमी पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनाने मागे वळून कधी पाहिले नव्हते. पण आज श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी शिवसैनिक देखील भावूक झाल्याचे पहायला मिळाले.
'शिवसेना' या चार अक्षरी मंत्राचा जयघोष करत पक्षासाठी मी माझी वाटचाल सुरू केली होती. किसन नगरच्या दहा बाय दहाच्या एकत्रित कुटूंबातून सुरू झालेला माझा प्रवास अथक प्रयत्न आणि परिश्रमाने राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत कसा येऊन पोहोचला ते श्रीकांतने आपल्या भाषणातून अगदी समर्पक शब्दात… https://t.co/fQTet7K5rG pic.twitter.com/bRH52jLOaK
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 16, 2024