SSC मार्फत जीडी कॉन्स्टेबलच्या तब्बल 26146 पदांसाठी भरती ; 10वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी

कर्मचारी निवड आयोगाने  जीडी कॉन्स्टेबलच्या 26146 पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली. अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 निश्चित करण्यात आली आहे.

या भरतीद्वारे आसाम रायफल्समधील बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि रायफलमनमधील जीडी कॉन्स्टेबलच्या हजारो रिक्त पदे भरली जातील. काही रिक्त पदे BSF ची 6174 पदे, CISF ची 11025 पदे, CRPF ची 3337 पदे, SSB ची 635 पदे, ITBP ची 3189 पदे, आसाम रायफल्स ची 1490 पदे, SSF ची 296 पदे आहेत. पुरुषांसाठी एकूण 23347 आणि महिलांसाठी एकूण 2799 पदे आहेत. पुरुषांसाठी 9626 आणि महिलांसाठी 1183 पदे अनारक्षित आहेत. पुरुषांमध्ये 3334 पदे SC, 2354 ST, 4776 OBC, 3257 पदे EWS प्रवर्गासाठी राखीव आहेत. तर महिलांमध्ये 408 पदे SC, 248 पदे ST, 584 OBC, 376 EWS साठी राखीव आहेत.

पात्रता – 10वी पास

वयोमर्यादा 18 वर्षे ते 23 वर्षे आहे. 1 जानेवारी 2024 पासून वयाची गणना केली जाईल. उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2001 पूर्वी आणि 01 जानेवारी 2023 नंतर झालेला नसावा. कमाल वयोमर्यादेत ओबीसींसाठी तीन वर्षे आणि एससी एसटी प्रवर्गासाठी पाच वर्षांची सूट असेल.

Fee: General/OBC: ₹100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

निवड कशी केली जाईल?
प्रथम लेखी परीक्षा (संगणक आधारित) होईल. यशस्वी उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मापन चाचणी (PST) साठी बोलावले जाईल. जे पीईटी पीएसटी उत्तीर्ण होतात त्यांना वैद्यकीय आणि कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. पीईटी पीएसटी केवळ पात्रता असेल. फक्त PET आणि PST मध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. वाढेल.

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online