तुम्हीही दहावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) मल्टी टास्किंग (नॉन-टेक्निकल) कर्मचारी आणि हवालदार (CBIC आणि CBN) या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. एकूण ८,३२६ रिक्त जागा भरण्यात येणार असून यापैकी ४८८७ रिक्त जागा मल्टी टास्किंग स्टाफसाठी आहे तर ३४३९ जागा CBIC आणि CBN मध्ये हवालदा पदांसाठी आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जाऊन अधिसूचना तपासू शकतात. उमेदवारांना फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याती शेवटची तारीख ३१ जुलै आहे. तर मग वेळ वाया न घालवता पात्र उमेदवारांनी लगेचच अर्ज करावा
किमान शैक्षणिक पात्रता:
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी
वयोमर्यादा : मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदारासाठी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्ष असावे, तर सीआयबीसीमध्ये हवालदार आणि एमटीएसच्या पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्ष आहे.
या अर्जासाठी १०० रुपये शुल्क घेण्यात येणार आहे. हे शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२४ आहे. याशिवाय अर्जामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर ते तुम्ही १७ ऑगस्ट २०२४ पर्यंत करु शकतात.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा