SSC CGL : पदवी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! तब्बल १७,७२७ पदांवर जम्बो भरती

तुम्हीही पदवी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. कर्मचारी निवड आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनने हजारो पदांसाठी भरती जाहीर केली आहे. SSC CGL अंतर्गत जवळपास १७ हजार हून अधिक जागांवर भरती करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत गट ब आणि गट क च्या एकूण १७,७२७ पदांवर भरती करायची आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2024 आहे. अर्ज करण्यापूर्वी अनिवार्य शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया इत्यादींबद्दल तपशीलवार माहिती घेऊ.

रिक्त पदाचे नाव :
1) असिस्टंट सेक्शन ऑफिसर
2) असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
3) इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
4) इन्स्पेक्टर
5) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6) सब इंस्पेक्टर
7) एक्झिक्युटिव असिस्टंट
8) रिसर्च असिस्टंट
9) डिविजनल अकाउंटेंट
10) सब इंस्पेक्टर (CBI)
11) सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर
12) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13) ऑडिटर
14) अकाउंटेंट
15) अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16) पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18) सिनियर एडमिन असिस्टंट
19) कर सहाय्यक
20) सब-इस्पेक्टर (NIA)
शैक्षणिक पात्रता:
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी:
 पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

या परीक्षेसाठी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८-३२ वर्ष असावे. या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी शिक्षण पूर्ण झाले असावे. याबाबत संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा