SSC Exam २०२४ : दहावीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आज जारी होऊ शकते !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेसाठी आज, 31 जानेवारी रोजी प्रवेशपत्र जारी करू शकते. बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल, तेथून तुम्ही शाळेने दिलेल्या लॉगिनचा वापर करून परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र बोर्ड एसएससी परीक्षा 2024 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत घेतली जाईल. परीक्षा पेन आणि पेपर पद्धतीने होईल. दहावी बोर्डाची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी 11 ते 2 आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी 3 ते 6 या वेळेत परीक्षा होणार आहे. जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच परीक्षा घेतली जाईल.