---Advertisement---

आजपासून बस प्रवास झाला महाग; जळगावहून असे आकारले जाणार बसचे भाडे

---Advertisement---

महाराष्ट्रात आजपासून बस प्रवास महागला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे आज शनिवारपासून एसटीची भाडे वाढ केली जात आहे. यामुळे प्रवाशांना एका तिकीटाच्या हल्लीच्या दरापेक्षा १५ टक्के जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. वाहनांसाठी लागणाऱ्या डिझेल, टायर, चोरीस या किंमतीत बदल झाला आहे. महागाईदेखील वाढली आहे. त्यामुळे एसटीच्या तिकींटामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.४ वर्षांनी पुन्हा एकदा एसटीच्या तिकीटांमध्ये वाढ झाली आहे.

शिवनेरी, रातराणी, साधी एसटी, शिवशाही, शिवशाही शयनयान, शिवाई, जनशिवनेरी, विना वातानुकुलित शयनयान बस (Non-AC ST)या एसटी बसच्या तिकींटामध्ये वाढ झाली आहे.

जळगावहून असे आकारले जाणार बसचे भाडे
संभाजीनगर – आधी -२४५ आता – २८२
मुंबई : आधी -८७५आता – १००६
नाशिक : आधी -३७५ आता – ४३१
पुणे: आधी – ६०० आता – ३६०
धुळे : आधी – १४० आता – १६१
चाळीसगाव : आधी – १५० आता – १७२
पाचोरा : आधी – ८० आता – ९२
भुसावळ : आधी – ४५ आता – ५२

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment