State Budget 2024 : अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने केल्या ‘या’ मोठ्या घोषणा; वाचा कुणाला काय मिळालं ?

State Budget 2024 : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने मोठ मोठ्या घोषणा केल्या आहेत. काय आहेत मोठ्या घोषणा जाणून घ्या.

सामूहिक विवाह योजनेच्या अनुदानात मोठी वाढ
– शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतील अनुदान १० हजार होते. ते आता २५ हजार केलं आहे.

– स्तन गर्भाशय कर्करोगाच्या निदानासाठी आरोग्य केंद्रात ७८ हजार कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका देऊ.

– हर घर नल, हर घर जलसाठी १ कोटी २५ लाख ६६ लाख घरांना नळजोडणी दिली आहे. राहिलेल्या घरांचे काम प्रगतीपथावर आहे.

तरूणांसाठी विशेष योजना
शैक्षणिक संस्थातून ११ लाख विद्यार्थी पदवी घेतात. डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थींची संख्या मोठी आहे. त्यांना औद्योगिक क्षेत्रात काम केल्यास त्यांना रोजगार मिळणार. दरवर्षी १० लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील अनुभव येण्यासाठी मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना राबवणार. दरवर्षी १० हजार रुपये देण्यात येईल. त्यासाठी १० कोटीची तरतूद करण्यात येईल. दरवर्षी ५० हजार युवकांना कार्यप्रशिक्षण दिलं जाणार आहे.

शेतकऱ्यासाठी योजना
ई- पंचनामा योजना राज्यभरात राबवण्यात येणार आहे. शेतमालाच्या स्थानिक पातळीवर माल साठवणुकीसाठी गाव तिथे गोदाम योजना राबवणार. १०० गोदामांची दुरुस्ती करणार आहे. कापूस आणि सोयाबीन पिकाचा राज्याच्या उत्पन्नात वाटा आहे. गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे नुकसान सोसावं लागलं होतं. आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मागेच कॅबिनेटने निर्णय घेतला होता. पण आचारसंहिता लागली होती. आता कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना पाच हजार देणार आहे.

कांदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०० कोटी रुपयांचा फिरता निधी तयार केला जाणार आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज व्हावीसाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप देण्यात येईल. या योजने करता ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्यात येणार आहेत, असंही अजित पवार म्हणालेत.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
अजित पवार यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. “४७.४१ लाख शेतीपंप वापरकर्ते आहेत. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौरकृषी योजना सुरु आहे. मार्च २०२४ ते ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्रकल्प मार्गी लावणार. साडेसात हॉर्सपॉवरपर्यंत पंप चालवतात. यांचा पूर्णपणे वीज माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ४७ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे”, असं अजित पवार म्हणाले.

‘नवीन दुग्धव्यवसाय योजना…’
“शेतकऱ्यांना मोफत वीज व्हावी यासाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप देण्यात येईल. या योजने करता ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्यात येणार आहे”, अशी मोठी घोषणा अजित पवार यांनी केली. “नवीन दुग्धव्यवसाय योजना सुरु केली जाईल. नवा उद्योजक निर्माण करताना शेतकऱ्यांमध्ये प्रोत्साहन देण्याचे काम करणार. प्रती लिटर ५ रुपये अनुदान दिले होते. राहिलेले अनुदान त्वरित वितरित केले जाईल. एक लीटर ५ रुपये प्रमाणे १ जुलैपासून अनुदान योजना सुरु केले जाईल”, अशी घोषणादेखील अजित पवार यांनी यावेळी केली.

दुर्बल घटकांसाठी विविध योजना
-‘सर्व स्वरुपातील सार्वत्रिक दारिद्रय नाहीसे करणे’ हे शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याचा निश्चय
-संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून निराधार, विधवा, दिव्यांग तसेच वृध्द
-नागरिकांच्या दरमहा अर्थसहाय्यात वाढ- एक हजारावरुन दीड हजार रुपये अशी वाढ – सन 2023-24 मध्ये 45 लाख -60 हजार लाभार्थींना 7 हजार 145 कोटी रुपये अनुदानाचे वाटप
-पान, पानपिंपरी आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी संत श्री -रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना
-नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तसेच कार्यरत महामंडळांसाठी निधीची पुरेशी तरतूद
-दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना’ – पहिल्या टप्प्यात 34 हजार 400 घरकुल बांधणार-
दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रीक वाहनाचे वाटप करणार
-तृतीयपंथी धोरण-2024 जाहीर-भरती प्रक्रियेमध्ये तसेच सर्व शासकीय योजनांमध्ये स्त्री-पुरुषांसोबतच ‘तृतीयपंथी’ हा लिंग -पर्याय उपलब्ध-तृतीयपंथीयांना राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेणे सुलभ
-धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांसाठी खारघर, नवी मुंबई येथे 4 हजार चौरस मीटरचा भूखंड
-महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळामार्फत नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना
-मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांकरीता कर्जावरील शासन -हमीची मर्यादा ३० कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपये
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबांना लागू
आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब १ लाख ५० हजार रुपयांवरून ५ लाख रुपये – एक हजार 900 रुग्णालयांमार्फत एक हजार 356 प्रकारचे उपचार उपलब्ध
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ३४७ ठिकाणी कार्यान्वित
पतसंस्थांच्या स्थिरीकरण व तरलतेसाठी 100 कोटी रुपये निधी
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी, पारधी व आदिम आवास योजना, मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण
मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनांच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात 35 लाख 40 हजार 491 घरकुल बांधण्यात येणार
सन 2024-25 मध्ये विविध घरकुल योजनांकरीता 7 हजार 425 कोटी रुपयांची तरतूद
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गिरणी कामगारांना 12 हजार 954 सदनिका वितरित-उर्वरित सदनिका उपलब्ध करुन देण्याचे नियोजन
सन 2024-25 साठी स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 1 हजार 886 कोटी 84 लाख निधीची तरतूद