तरुण भारत लाईव्ह न्युज : राज्यातील सर्व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी व अ कृषी विद्यापीठ कर्मचारी आज २० फेब्रुवारीपासून संपावर जाणार आहेत.
प्रमुख पाच मागण्यांसाठी. २ फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार, १४ फेब्रुवारी रोजी अवकाश काळात निदर्शने, १५ फेब्रुवारी रोजी काळ्याफिती लावून कामकाज केले. तसेच १६ फेब्रुवारी रोजी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक संप केला. परंतु सरकारने कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय न दिल्यामुळे पुढील टप्प्यात ठरल्यानुसार २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत हे आंदोलन विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचे प्रमुख सल्लागार डॉ.आर.बी.सिंग व प्रमुख संघटक अजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
या संपात कर्मचार्यांच्या मागण्यात आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करणे १० २० ३० ही योजना लागू करणे. नोकर भरती करणे, सातव्या वेतन आयोग लागू झाल्यापासून फरक मिळणे अशा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी संघटना गेल्या दोन-तीन वर्षापासून लढा देत आहे परंतु सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे संघटनेला संपाचा मार्ग अवलंबावा लागला. १५ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या समवेत संयुक्त कृती समितीची बैठक झाली. परंतु त्यात ठोस काही निर्णय झाला नाही त्यामुळे संयुक्त कृती समितीने ठोस निर्णयाशिवाय माघार नाही अशी भूमिका घेतली असल्याने संप अटळ आहे.
संप हा कोणत्याही संस्थाचालक किंवा प्राचार्यांच्या विरोधात नाही आमच्या रास्त मागण्या शासन निर्णय काढून मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही असे आवाहन पूर्वी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जी.वाय.पाटील, डॉ.ऋषिकेश चित्तम, शालिकराव तिरुमळे, विजय सजन पाटील, अजय शिंदे, प्रसाद वसंतराव पाटील यांनी केले आहे.