पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर, जळगाव मनपातर्फे १८ कारखान्यांची तपासणी

---Advertisement---

 

जळगाव : एका आठवड्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची सर्वत्र धुमधडाक्यात तयारी केली जात आहे. सार्वजनिक गणेश मंडळ तसेच घरगुती गणेशाची स्थापना करण्यात येत असते. हा गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करण्यात यावा यासह इतर मार्गदर्शक सूचना व नियमावली शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आली आहे. यानुसार जळगाव महापालिकेतर्फे गुरूवारी (२१ ऑगस्ट) रोजी शहरातील १८ गणेश मूर्ती तयार करणाऱ्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत विक्रेत्यांना पीओपी मूर्ती उत्पादक आणि विक्रेत्यांना मूर्तीवर लाल रंगाचे गोल चिन्ह करणे तसेच विक्रीची नोंदवही ठेवणे बंधनकारक करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

जळगाव महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके करण्यात आली आहेत. या पथकांनी गुरुवारपासून शहरात विविध भागांमधे पीओपीपासून मूर्ती तयार केल्या कारखान्यांची पाहणी सुरू केली आहे. यात एमआयडीसी, नेरी नाका, कुसंबा नाका, कालिंका माता चौक , गोदावरी कॉलेज परिसर, कांचननगर, ममुराबाद रस्ता, शिवाजीनगर, कानळदा रस्ता, बांभोरी रस्ता, अजिंठा चौफुली, नेरीनाका, कुसुंबा नाका यांसारख्या भागांमधील १८ कारखान्यांची तपासणी केली. यात अनेक मूर्तीवर लाल चिन्ह नसल्याचे आढळले. पथकांनी तातडीने मूर्तिकारांना प्रत्येक मूर्तीवर लाल रंगाने गोल चिन्ह लावण्याच्या आणि विक्रीची नोंद ठेवण्याच्या सूचना दिल्या.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई


पीओपी मूर्तीच्या मागील बाजूस लाल चिन्ह करणे, प्रत्येक मूर्ती विक्रीची वहीत नोंद ठेवण्याचेही आदेश मूर्ती उत्पादक आणि विक्रेत्यांना देण्यात आले. तर नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचा केली जाणार असल्याचे माहिती मनपातर्फे दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---