कबड्डी स्पर्धा : पुरुष संघात क्रिडा रसिक, महिला संघात स्वामी स्पोर्ट्सने मारली बाजी

जळगाव : हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (ठाकरे गट) जळगाव महानगर आणि कैलास क्रीडा मंडळ यांच्या वतीने हिंदूहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे चषक भव्य कबड्डी स्पर्धेचे जेतेपद पुरुष संघात क्रीडा रसिक संघाने पटकावले तर या महिलांमध्ये स्वामी स्पोर्ट्स संघाने पद पटकावले.

पुरुषांचा अंतिम सामना हा ३१ ३१ गुणांनी ड्रॉ झाला. पुढे दोघांना पाच पाच रेड करण्याची संधी मिळाली. यामध्ये क्रीडा रसिकने ९ गुण पटकावले आणि जिंकून आले. यावेळी महर्षी वाल्मीक संघ केवळ ४ गुण घेतले अखेर क्रीडा रसिक संघाचा विजय झाला. तर महिलांमध्ये अंतिम सामन्यात विजेता संघाने ३६ गुण पटकावले तर पराभूत आर.सी.पटेल संघाने ११ गुण पटकावले. अंतिम सामना अतिशय उत्कंठा वाढवणारा झाला. तिसऱ्या स्थानी पुरुषांमध्ये एन.टी.पी.एस नंदुरबार आणि महिलांमध्ये एकलव्य क्रीडा मंडळ जळगाव हे संघ राहिले. अंतिम स्पर्धेसाठी ३ हजाराहून अधिक प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद देत स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

दि.२१ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान शिवतीर्थ मैदानावर कबड्डी चषक स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. स्पर्धेसाठी क्रीडा रसिक मंडळ, नेताजी सुभाष क्रीडा मंडळ, महर्षी क्रीडा मंडळ, महर्षी वाल्मिक क्रीडा मंडळ यांचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धेसाठी नगरसेवक नितीन बर्डे, सुनील राणे, बन्सी माळी, पूनम राजपूत, बाळा कंखरे, उमेश चौधरी आणि कमलेश पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. याचबरोबर शिवसेनेच्या विविध आघाड्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले.

बक्षीस समारंभ वितरण प्रसंगी
आयोजक शरद आबा तायडे, प्रशांत सुरडकर, महापौर जयश्री महाजन, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, निलेश चौधरी, महानंदा पाटील, नगरसेविका ज्योती तायडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, अभियंता प्रकाश पाटील, आनंदसिंग पाटील, पियूष गांधी, दिलीपकुमार जैन, नीलू इंगळे, विमल वाणी, नितीन सपके, ललित धांडे आदी उपस्थित होते.