Maharashtra ST Bus : महाराष्ट्रात पहिल्यांदाच एसटी बस चालवताना आपल्याला महिला चालक बघायला मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिलांना चालक होण्याची संधी दिली आहे. विशेष, एक महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते. हे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘या’ निर्णयातून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिलांना चालक होण्यासाठी प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. महिला देखील उत्तम चालक होऊ शकतात यावर त्यांचा विश्वास होता आणि त्यांनी महिलांना प्रशिक्षण देण्याचं ठरवलं.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत येणाऱ्या पुणे विभागात एकूण 17 महिलांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. यातील सहा महिलांनी पहिल्या टप्प्यातील 3 हजार किलोमीटरचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे तर सहा महिला एसटी चालकांचे दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरू आहे. हे प्रशिक्षण मार्चअखेर पूर्ण होईल आणि लालपरीचे स्टेअरिंग या महिलांच्या हाती येईल.
यातील प्रशिक्षण घेणाऱ्या एका महिलेने तर बँकेची नोकरी सोडून चालक होण्यासाठी अर्ज भरला अंजु डूकले, शीतल शिंदे आणि भाग्यश्री भगत या एसटी चालक व वाहक महिलांशी सूत्रांनी संवाद साधला. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिलांना डेपो दिला जाईल आणि त्यादेखील रोज आपल्याला बस चालवताना दिसतील.