डॉक्टरांचा राज्यव्यापी संप: अॅलोपॅथीवरील निर्णयावरून सरकारविरोधात संताप

---Advertisement---

 

भुसावळ : इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील डॉक्टरांनी राज्य सरकारविरोधात संप पुकारला आहे. राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथी औषधोपचार करण्यास दिलेल्या परवानगीच्या निर्णयाविरोधात हा संप करण्यात आला आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय क्षेत्रात तीव्र असंतोष पसरला असून, भुसावळ शहरातील डॉक्टरांनी देखील या संपामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

वैद्यकीय शिक्षणाच्या मूल्याची हानी : डॉक्टरांची भूमिका

“MBBS पदवी मिळवण्यासाठी ५ वर्षे कठोर शिक्षण आणि नंतरचा अनुभव आवश्यक असतो. अशा परिस्थितीत फक्त काही वर्षांच्या होमिओपॅथी शिक्षणावर अॅलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची परवानगी देणे म्हणजे रुग्णांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक डॉक्टरांनी दिली आहे.

सरकारकडे मागणी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

डॉक्टरांच्या मते, अॅलोपॅथी उपचारासाठी लागणारे सखोल ज्ञान, अनुभव आणि वैद्यकीय निर्णयक्षमतेचा अभाव होमिओपॅथी प्रशिक्षित डॉक्टरांमध्ये असतो, ज्यामुळे चुकीच्या उपचारांची शक्यता वाढू शकते. याचा थेट परिणाम रुग्णसेवेच्या गुणवत्तेवर होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

सरकारच्या निर्णयावरून वैद्यकीय क्षेत्रात दोन गट

या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय क्षेत्रात दोन विचारसरणी निर्माण झाल्या असून,एकीकडे रुग्णांच्या आरोग्यासाठी अत्यंत दक्ष असलेल्या डॉक्टरांचा विरोध,तर दुसरीकडे ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी सरकारचा निर्णय योग्य असल्याचे काहींचे मत आहे.मात्र,बहुसंख्य अॅलोपॅथिक डॉक्टरांचा विरोध अधिक तीव्र आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---