ICC Champions Trophy 2025 : टीम इंडियाने दुबईत झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियावर ४ गाडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी २६५ धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान ११ चेंडू राखून ६ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम इंडियाने ४८.१ ओव्हरमध्ये २६७ धावा केल्या. टीम इंडियाने या विजयसह एकूण पाचव्यांदा तर सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये प्रवेश केला. तर दुसऱ्या बाजूला पराभवासह ऑस्ट्रेलियाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आलं. ऑस्ट्रेलिया पराभवासह स्पर्धेतून बाहेर झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या एका बड्या खेळाडूने वनडेमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. मात्र टीम इंडिया सुरक्षिततेच्या कारणामुळे दुबईत आपले सामने खेळले. टीम इंडियाने साखळी फेरीतील ३ आणि उपांत्य असे एकूण ४ सामने दुबईत खेळले. तर आता उपांत्य फेरीतील दुसर्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध द आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. हा सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये थोड्याच वेळात सुरू होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्व स्टीव स्मिथने केलं. टीम इंडियाने दुबईत झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियावर ४ गाडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी २६५ धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान ११ चेंडू राखून ६ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम इंडियाने ४८.१ ओव्हरमध्ये २६७ धावा केल्या. टीम इंडियाने या विजयसह एकूण पाचव्यांदा तर सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये प्रवेश केला. तर दुसऱ्या बाजूला पराभवासह ऑस्ट्रेलियाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आलं. ऑस्ट्रेलिया पराभवासह स्पर्धेतून बाहेर झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या एका बड्या खेळाडूने वनडेमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.