चविष्ट काजू हलवा रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । ३० मार्च २०२३। काजू हलवा गोड डिशेशपैकी उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात बनणारी एक पाककृती आहे. साखरेचा पाक व काजूची पावडर वापरुन ही चविष्ट डिश तयार केली जाते. आरोग्यवर्धक असणारा हा काजू हलवा खाण्यासाठीही तितकाच टेस्टी असतो. काजू हलवा घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
साजूक तूप, गव्हाचं पीठ, काजू पावडर, वेलची पूड व बदामाचे काप

कृती
सर्वप्रथम मिक्समध्ये काजूंची बारीक पावडर करुन घ्या. एक पॅनमध्ये ३ कप पाणी गरम करुन त्यात १ कप साखर घाला. ४ ते ५ मिनिटे पाणी उकळवून घ्या. आता त्यात केसरच्या कांड्या घालून पाणी पुन्हा उकळवा. दुस-या पॅनमध्ये साजूक तूप घ्या. तूप वितळल्यानंतर त्यात अर्धा कप गव्हाचं पीठ घालून चांगलं ढवळा. १ मिनिटे मिश्रण उकळून घेतल्यानंतर त्यामध्ये काजूची पावडर घालून सर्व सामग्री व्यवस्थित मिक्स करा. पेस्टचा रंग बदलत नाही तोपर्यंत मंद आचेवर मिश्रण चांगलं शिजवून घ्या.आता काजूच्या पेस्टमध्ये साखरेचा पाक घाला व सतत ढवळत राहा. तयार झालाय आपला चविष्ट व पौष्टिक काजूचा हलवा! हलव्याचा आस्वाद घेण्याआधी त्यात चिमुटभर वेलची पूड व बदामाचे काप घालून चांगलं मिक्स करा.