Stock Market Closing: आजच्या (२९ एप्रिल ) ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि निफ्टी किंचित वाढीसह बंद झाले. आजच्या व्हयव्हरांती सेन्सेक्स ७० अंकांनी वधारला. तर निफ्टी ७ अंकांच्या किरकोळ वाढीसह बंद झाला. आजच्या व्यवहारादरम्यान, आयटी, तेल आणि वायू समभागांमध्ये सर्वात जास्त वाढ दिसून आली. दुसरीकडे, फार्मा, युटिलिटी आणि मेटल समभागांमध्ये घसरण झाली.
व्यापाराच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स ७०.०१ अंकांनी वाढून ८०,२८८.३८ वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी ७.४५ अंकांनी वधारून २४,३३५.९५ वर बंद झाला.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २,००० कोटींची वाढ
आज २९ एप्रिल रोजी बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४२६.१२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे सोमवार २८ एप्रिल रोजी ४२६.१० लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज सुमारे २००० कोटी रुपयांनी वाढले आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २००० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.