---Advertisement---

Stock Market Closing: शेअर बाजार वधारला, सेन्सेक्स 287 अंकांच्या वाढीसह बंद

---Advertisement---

Stock Market : भारतीय शेअर बाजार आज सलग दुसऱ्या दिवशीही तेजीसह बंद झाले. आज आज पीएसयू बँकांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी दिसून आली. तर ऑटो आणि फार्मा शेअर्समध्ये विक्री झाली.

आजच्या व्यवहारांती बीएसई सेन्सेक्स 309.40अंकांनी वाढून 77044.29वर बंद झाला.तर एनएसईचा निफ्टी108.65अंकांनी वाढून 23437.20 वर बंद झाला. आजच्या ट्रेडिंग सत्रात, स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांक देखील हिरव्या रंगात बंद झाले.

गुंतवणूकदारांनी ₹2.76 लाख कोटी कमावले

आज 16 एप्रिल रोजी बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 415 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील व्यहाराच्या दिवशी म्हणजेच मंगळवार, 15 एप्रिल रोजी 412.24 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.76 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.

कोणते शेअर्स वधारले ?

इंडसइंड बँके,अ‍ॅक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट, भारती एअरटेल या समभागात सर्वाधिक वाढ दिसून आली.

कोणते शेअर्स घसरले ?

मारुती सुझुकी, इन्फोसिस, टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) आणि एनटीपीसी, या समभागात सर्वाधिक घसरण झाली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment