Stock Market : आज देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीस बंद झाला. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स 1,508 अंकांनी वाढून 78,553.20 वर बंद झाला. निफ्टी 414 अंकांनी वाढून 23,851 वर बंद झाला. बँक निफ्टी 1,172 अंकांनी वाढून 54,290 पातळीवर बंद झाला.
आजच्या व्यवहारात सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. टेलिकॉम, पीएसयू बँक, ऑइल अँड गॅस, फार्मा, ऑटो, एनर्जी आणि प्रायव्हेट बँक निर्देशांक १-२ टक्क्यांनी वधारले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी वधारले.
कोणते शेअर्स वधारले ?
भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, सन फार्मा, इटरनल हे आज निफ्टीमध्ये सर्वाधिक वधारले.
कोणते शेअर्स घसरले ?
विप्रो, हिरो मोटोकॉर्प, टेक महिंद्रा, कोल इंडिया आणि जेएसडब्ल्यू स्टील हे आज सर्वाधिक तोट्यात होते.
गुंतवणूकदारांनी 4.49 लाख कोटी कमावले
आज 17 एप्रिल रोजी बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 419.49 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील व्यापार सत्रात म्हणजेच बुधवार, 16 एप्रिल रोजी 415 लाख कोटी रुपये होते.
जागतिक बाजारपेठेतील अपडेट
टॅरिफ वॉरमुळे अमेरिकेतील महागाईबद्दल चिंता वाढत आहे. अशा परिस्थितीत, शेअर बाजारात त्याचा स्पष्ट परिणाम दिसून येत आहे. बुधवारी वॉल स्ट्रीटवर मोठी उलथापालथ दिसून आली. खरं तर, फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी महागाई वाढण्याची आणि अमेरिका टॅरिफवर मंदीकडे जाण्याची भीती व्यक्त केली आहे.
टॅरिफ धोरण स्पष्ट होईपर्यंत त्यांनी व्याजदर कमी न करण्याचे संकेत दिले आहेत. अशा परिस्थितीत, फेडच्या चिंतेमुळे आणि टेक स्टॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे काल अमेरिकन बाजार घसरला होता. १००० अंकांच्या उलथापालथी दरम्यान, डाउ ७०० अंकांनी घसरला तर नॅस्डॅकमध्ये ५०० अंकांची मोठी घसरण नोंदवली गेली.