Stock Market : आज ( २१ एप्रिल ) रोजी भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी तेजी आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. बीएसई चा सेन्सेक्स 350 अंकांनी वाढून 78,903 वर उघडला. निफ्टी 98 अंकांच्या वाढीसह 23,949 वर उघडला. बँक निफ्टी 601 अंकांनी वाढून 54,891 वर उघडला. आज बँक निफ्टीने त्याचा सर्वकालीन उच्चांक मोडला आहे.
कोणते शेअर तेजीत
TECHM, HDFCBANK, ICICIBANK, INFY, HCLTECH, AXISBANK,हे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत.
कोणते शेअर घसरणीत
ETERNAL, HINDUNILVR, MARUTI, ADANIPORTS, ASIANPAINT, या शेअर्स मध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळत आहे.
शेअर बाजार का वाढला?
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार डॉ. व्ही.के. विजयकुमार यांनी एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की जागतिक अनिश्चितता असूनही, भारत चांगल्या स्थितीत असल्याचे दिसून येते. ते म्हणाले की जागतिक आर्थिक परिस्थिती अनिश्चिततेत अडकली असली तरी, भारत तुलनेने लवचिक दिसतो. जागतिक वातावरणातील मंदी असूनही ६ टक्के दराने वाढ करण्यास सक्षम असलेली ही एकमेव मोठी अर्थव्यवस्था आहे. ते म्हणाले की कमकुवत डॉलरमुळे नजीकच्या भविष्यात परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (एफपीआय) भारतात ओघ वाढू शकतो.
गुंतवणूकदारांना ३ लाख कोटी रुपयांचा फायदा
शेअर बाजारातील वाढीमुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फायदा झाला आहे. गुरुवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा बीएसईचे मार्केट कॅप ४,१९,६०,०४३.३१ कोटी रुपये होते, जे सोमवारी ४,२३,२०,२५६.७३ कोटी रुपयांवर आले. याचा अर्थ गुंतवणूकदारांना ३.६० लाख कोटी रुपयांचा नफा झाला आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान हा नफा आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.