---Advertisement---

Stock Market Opening: शेअर बाजार तेजीसह उघडला; सेन्सेक्सची 178 अंकांच्या वाढीसह सुरुवात

---Advertisement---

Stock Market Opening: आठवड्यतील दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजारात मोठी वाढ दिसून येत आहे. आजच्या ट्रेडिंग सत्राच्या सुरवातीला सेन्सेक्स 178 अंकांनी वाढून 80,396 वर व्यवहारास सुरुवात केली. निफ्टी 42 अंकांनी वाढून 24,370 वर उघडला. बँक निफ्टी 92 अंकांनी वाढून 55,524 वर उघडला. निफ्टी एफएमसीजी वगळता इतर सर्व निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत.

जागतिक बाजारपेठेतील अपडेट?

आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारपेठांमध्ये खरेदी दिसून येत आहे. सोमवारी याआधी अमेरिकन बाजार संमिश्र स्थितीत बंद झाले होते. सोमवारी, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल 114 अंकांनी वाढून 40,227.59 वर बंद झाला. नॅस्डॅक कंपोझिटमध्ये 17 अंकांची घसरण झाली आणि तो 17,366.13 वर बंद झाला. तर S&P 500 निर्देशांक सुमारे 4 अंकांनी वाढून 5,528.75 वर बंद झाला. अमेरिकन बाजारपेठेसाठी आता सर्वात मोठा ट्रिगर म्हणजे कॉर्पोरेट निकाल. बाजार अॅपल, मेटा, अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टच्या निकालांची वाट पाहत आहे.

Stock Market Today

एफआयआय भारतीय शेअर बाजारात खरेदीदार

बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की डॉलर कमकुवत झाल्यामुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यामुळे, एफआयआय भारतीय शेअर्सकडे परततांना दिसत आहेत. अलिकडच्या काळात, उच्च परदेशी शेअरहोल्डिंग असलेल्या काही बँकिंग स्टॉक्समध्ये सतत वाढ दिसून आली आहे. खरेदीच्या नऊ ट्रेडिंग सत्रांनंतर, एप्रिल महिन्यात एफआयआय भारतीय शेअर बाजारात निव्वळ खरेदीदार बनले आहेत. नवीन गुंतवणुकीसह, एफआयआय आता एप्रिलमध्ये निव्वळ खरेदीदार बनले आहेत. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (डीआयआय) देखील खरेदी करत आहेत. त्यांनी सलग दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात २,८१७ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment