---Advertisement---

Stock Market: शेअर बाजार घसरला; भारत-पाक तणावात गुंतवणूकदारांचे 5.4 लाख कोटी पाण्यात

---Advertisement---

Stock Market: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे भारतीय शेअर बाजार आज घसरणीसह बंद झाला. आजच्या व्यवहार सत्राच्या शेवटी, सेन्सेक्स ४११.९७ अंकांनी घसरून ८०,३३४.८१ वर बंद झाला आणि निफ्टी १४०.६० अंकांनी घसरून २४,२७३.८० वर बंद झाला.

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे बाजार सध्या सावध भूमिकेत आहे. अशा परिस्थितीत, सीमेवर तणाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे बाजारात होणारी कोणतीही सुधारणा केवळ अल्पकालीन असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

कोणते शेअर्स घसरले ?

श्रीराम फायनान्स, इटरनल, एम अँड एम, टाटा कंझ्युमर,अदानी एंटरप्रायझेस,महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स आणि टाटा स्टील या शेअर्स मध्ये घसरण झाली.

कोणते शेअर्स वधारले ?

एचसीएल टेक्नॉलॉजीज, कोटक महिंद्रा बँक, टायटन कंपनी, अ‍ॅक्सिस बँक, कोल इंडिया, टाटा मोटर्स, या शेअर्समध्ये वाढ नोंदवली गेली.

गुंतवणूकदारांचे 5.4 लाख कोटीचे नुकसान

आज 8 मे रोजी बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 418.10 लाख कोटी रुपयांवर घसरले, जे मागील व्यापार दिवशी म्हणजेच बुधवार, 7 मे रोजी 423.50 लाख कोटी रुपये होते. अश्याप्रकारे, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 5.4 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment