---Advertisement---

Operation Sindoor:  शेअर बाजारावर ‘ऑपरेशन सिंदूर’ चा परिणाम, सेन्सेक्स १०५ अंकांनी वाढून बंद, कोणते शेअर्स वधारले?

---Advertisement---

Operation Sindoor:  बुधवारी, ७ मे रोजी झालेल्या अस्थिर व्यापार सत्रानंतर, भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाला. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात थोडीशी घसरण झाली. परंतु नंतर बाजार सावरला. स्मॉलकॅप आणि मिडकॅप समभागांमध्ये चांगली वाढ झाली. बीएसई मिडकॅप निर्देशांक आणि स्मॉलकॅप निर्देशांक दोन्ही १.३६ टक्क्यांनी वाढून बंद झाले. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स 105 अंकांनी वाढून 80,746 वर बंद झाला.तर निफ्टी 34 अंकांनी वाढून 24,414 वर बंद झाला.

कोणते शेअर्स वधारले?

आज बीएसई सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 18 शेअर्स वाढीसह बंद झाले. टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, इटरनल, महिंद्रा अँड महिंद्रा (एम अँड एम) आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

कोणते शेअर्स घसरले?

आजच्या व्यवहारात एशियन पेंट्सचा शेअर सर्वाधिक 3.53 टक्क्यांनी घसरला., सन फार्मा, आयटीसी, एचसीएल टेक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज, हे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांनी ₹२.२१ लाख कोटी कमावले

आज ७ मे रोजी बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४२३.५२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील व्यापार दिवशी म्हणजेच मंगळवार, ६ मे रोजी ४२१.३१ लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २.२१ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment