अमळनेर : अनैतिक संबंध लपवण्यासाठी पोटच्या मुलाला संपवल्याची घटना २ फेब्रुवारी २०१९ मध्ये घडली होती. याप्रकरणातील दोघा आरोपींना न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अधिक माहिती अशी की, फिर्यादीने २ फेब्रुवारी २०१९ मध्ये चोपडा पोलिसांकडे मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांत नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलीस तपासात आईने व मामाने आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी मुलाला संपविल्याचे समोर आले होते. दरम्यान दोघा आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर या लप्रकरणी ३ मार्च रोजी जिल्हा न्यायाधीश २ पी. आर. चौधरी यांचेपुढे खटल्याचे कामकाज चालले त्यामध्ये सरकारी वकील अॅड. किशोर आर. बागुल यांनी कामकाज पाहिले. खटल्यात एकुण १५ साक्षीदार तपासण्यात आले.
यामध्ये सरकार पक्षातर्फे गिताबाईचे पती दगडु लोटन पाटील, बहीण प्रतिभा दगडु पाटील, प्रदिप कुलदिप पाटील, डॉ. निलेश देवराज तसेच डॉ. स्वप्नील कळसकर तसेच श्वान पथक जळगांव व तपासणी अधिकारी मनोज पवार, ए.पी.आय.योगेश तांदळे एए.पी. आय यांनी प्रथमिक तपास केला त्यानंतर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी पुढील तपास केला.
सदर खटल्यात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व दंड रुपये ३००/- दंड व दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास, तसेच भा.द.वि. कलम २०१ प्रमाणे दोन वर्षे सक्त मजुरी अशी शिक्षा ठोठावण्यात आली. या कामी पैरवी अधिकारी, ए.एस.आय. उदयसिंग साळुंके, व पो. नाईक हिरालाल पाटील, व चोपडा शहर पोलीस स्टेशन चे पोलीस कॉ. नितीन दिलीप कापडणे व पो.हवलदार हरीप तेली यांनी काम पाहीले.
आरोपी कारागृत असल्याने वकील लावण्याची परिस्थीती नसल्याने त्यांना शासनाकडून विधी व सेवा समितीकडुन वकील देण्यात आले होते त्यामुळे आरोपीतांना कमीत कमी दंड करण्यात आला. असे सहा. सरकारी वकील,अमळनेर ऍड के. आर. बागुल यांनी कळविले.