---Advertisement---
भुसावळ, प्रतिनिधी : भुसावळ शहर पोलीस स्टेशन हद्दीत स्था.गु.शा.पथकाने एक मोठी कारवाई करत होंडा शोरूममधून चोरीस गेलेली मोटरसायकल हस्तगत केली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशानुसार पोलीस पथकाने 2 ऑक्टोबर 2025 रोजी भुसावळ डिव्हिजन परिसरात गस्त घालत असताना अण्णाभाऊ साठे नगर येथे संशयित हालचाली करणारा एक तरुण आढळला.
पो.उपनिरीक्षक रवी नरवाडे, पोलिस गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे यांनी मिळून कारवाई केली.
संशयिताचे नाव रत्नेश पुरुषोत्तम रोडे,रा. अण्णाभाऊ साठे नगर,भुसावळ असे आहे. त्याच्याकडे विना नंबरची होंडा शाइन मोटरसायकल मिळाली.चौकशीत त्याने ती मोटरसायकल आपण काम करत असलेल्या होंडा शोरूममधून चोरी केल्याची कबुली दिली.
मोटरसायकलची किंमत ₹1,02,000 असून,इंजन क्रमांक: JC85ED4164197 चेसिस क्रमांक: ME4JC85NGSD103296 असा आहे.या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनमध्ये CCTNS क्र. 227/2025, कलम 336(2), 306 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.









