---Advertisement---

अलिबाग बसस्थानकासमोर तुफान राडा, फोडल्या बसेसच्या काचा, काय कारण?

---Advertisement---

अलिबाग : राज्य परिवहन महामंडळाच्या दोन एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना अलिबागमध्ये घडली आहे. या अपघातात एका दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेनंतर बसची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयदीप बना असे मृत तरुणाचे नाव आहे. दोन्ही बस अलिबाग बस स्थानकात शिरत असताना हा अपघात झाला.

अपघात इतका भीषण होता की, दोन बसेसमध्ये चिरडून एका दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला. तर एका रिक्षेचेही नुकसान झालं आहे.

दोन्ही एसटी बसच्यामध्ये तरुण मोटार सायकलसह चिरडला गेला. अपघातानंतर मृत तरुणाच्या संतप्त नातेवाईकांनी घटनास्थळी जोरदार राडा केला. मृत तरुणाच्या नातेवाईकांनी अपघातग्रस्त एसटी बसेसच्या काचा फोडून वाहतूक रोखून धरली असून, या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment