नवी दिल्ली । आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षांतील उत्तरपत्रिकांमध्ये अजब-गजब उत्तरं लिहीण्यात आल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे, मात्र आता ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थिनीने पास होण्यासाठी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांमध्ये अजब-गजब मागणी केली. उत्तर पत्रिकांमधील विद्यार्थिनीचे उत्तरं पाहून शिक्षकही चक्रावले. हे प्रकरण बिहारच्या आरा येथील वीर कुंवर सिंह विश्वविद्यालयातील आहे.
दरम्यान सध्या विद्यापीठाच्या ऑनर्स विषयांच्या प्रती मूल्यांकनासाठी पाठवल्या जात आहेत, तर जीईएसच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन विद्यापीठ स्तरावरच केले जात आहे. मात्र या उत्तरपत्रिकांमध्ये परीक्षकांना आश्चर्यकारक उत्तरे वाचायला मिळत आहेत. एवढंच नव्हे तर परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या उत्तर पत्रिकांमध्ये विचित्र विनंती करून आपल्याला पास करा असे आवाहनही केले आहे.
काय केली मागणी?
GES च्या उत्तरपत्रिकेत, एका महिला उमेदवाराने प्रश्नांची उत्तरे लिहीली, पण सर्वात शेवटी तिने विनंती केली आहे. ‘माझी तब्येत खूपच खालावली होती. हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो की मला पास करा. सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, पण सगळी उत्तर लिहू शकले नाही. कृपया चांगले गुण देऊन (मला ) पास करा’ अशी विनंतीच तिने केली आहे.