---Advertisement---
पाळधी, :जळगाव शहरातील मोकाट कुत्रे वेथील महामार्गावर सोडून दिल्याने त्यांनी पाळधी गावात प्रवेश केला आहे. यामुळे बालक, महिला व नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्रास
पाळधी येथे मोकाट कुत्र्यांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. येथील गांधी चौकात तर तब्बल ५० ते ६० कुत्र्यांची नेहमीच जत्रा भरलेली असते. हीच स्थिती येथील मुख्य रस्त्याची आहे. तर दोन्ही गावातही मोकाट कुत्रे बिनधास्त फिरतात. गांधी चौकात मटण मार्केट असून दुकानदार त्यांची घाण तेथेच फेकतात. त्यामुळे त्यांना आयतेच खायला मिळते.
हे मोकाट कुत्रे सकाळी शाळा, कॉलेजला जाणारे मुले, मुली तर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या मागे लागतात. त्यामुळे त्यांना हातात काठी घेऊनच बाहेर पडावे लागते. या मोकाट कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतला आहे. त्यात काही राजकीय पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. मात्र, त्याचे कोणतेच सोयर सुतक येथील प्रशासनाला नाही. येथील प्रशासनावर नेमका
दरम्यान, जळगाव महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पकडलेली मोकाट कुत्रे हे ते महामार्गावरच सोडून देतात. तेथून ते गावात दाखल होतात. तर गावात प्रवेश करताच त्यांना मटण मार्केटची खायला मिळते. त्यामुळे ते मांसाहारी होऊन नागरिकांना चावा घेतात. या बाबत दोन्ही गावाचे प्रशासन सुस्त आहे. याबाबत ग्रामपंचायतीने कारवाई न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर काही जागरूक नागरिक आंदोलन करण्याचा तयारीत आहेत. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने याबाबत स्पष्ट आदेश दिले असूनही येथील प्रशासन इतके सुस्त कसे? हा प्रश्न अनुत्तरित आहे.