इक्वेडोरमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के; १२ जणांचा मृत्यू

तरुण भारत लाईव्ह । १९ मार्च २०२३। दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ६.७ इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपामध्ये अनेक घरे आणि इमारतींचे मोठे नुकसान झाले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीचा कुएनका येथे मृत्यू झाला. भूकंपाच्या वेळी तो कारमध्येच उपस्थित होता, तेव्हा अचानक इमारत त्याच्या अंगावर पडली. याशिवाय एल ओरो या किनारी राज्यामध्ये आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वेगवेगळ्या भागातून मृतांचा आकडा समोर येत आहे. आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशाच्या कोस्टल ग्वायस भागात 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद केली आहे. भूकंपाचे केंद्र इक्वेडोरचे दुसरे सर्वात मोठे शहर ग्वायाकिलच्या दक्षिणेस सुमारे ५० मैल अंतरावर होते. ग्वायासमध्ये भूकंप इतका तीव्र होता की संपूर्ण शहरात त्याचे धक्के जाणवले. अनेक घरे आणि इमारतींचे मोठे नुकसान झाले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे.