तरुण भारत लाईव्ह । २३ फेब्रुवारी २०२३। सीरिया आणि तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत असताना आज सकाळी चीन मध्ये ७.३ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या तीव्र झटक्याने चीन हादरला आहे. चीनमध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता तुक्रस्तानमध्ये आलेल्या भूकंपाच्या तुलनेत अधिक होती.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी चीन मध्ये ७.३ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. तजाकिस्तानच्या सीमेलगत चीनच्या शिंजियांगमध्ये भूकंप आला आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.3 एवढी नोंदवली गेली आहे. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपात 40 हजार पेक्षा जास्त लोंकाना आपला जीव गमवावा लागला. सुदैवाने या तिन्ही देशात झालेल्या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
भूकंपाची कमाल तीव्रता अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. तथापि, रिश्टर स्केलवर ७.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप मध्यम धोकादायक मानला जातो. या स्केलवर 2 किंवा त्यापेक्षा कमी तीव्रतेच्या भूकंपाला सूक्ष्म भूकंप म्हणतात, जो बहुतेक जाणवत नाही. ४.५ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे घरांचे नुकसान होऊ शकते.
भूकंपाचे मुख्य कारण काय ?
नैसर्गिकरीत्या भूकंप होण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. भूकंपाचे पहिले कारण असे की, पृथ्वीवर ज्या ठिकाणी मुळातच भूकवचावर भेगा आहेत, आणि अशा भेगांखालचे खडकांचे थर किंवा शिलाखंडांच्या चकत्या जेव्हा एकमेकांवर घसरतात तेव्हा होणाऱ्या अकस्मात हालचाली हे भूकंपाचे पहिले कारण आहे.
भूकंपाचे दुसरे कारण असे की, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेदेखील भूकंप घडतात. १८६८ मध्ये हवाई बेटांमधल्या ’मौना लोआ’ ज्वालामुखीचा उद्रेक होण्यापूर्वी तेथे सतत सहा दिवस वाढत्या तीव्रतेचे भूकंप होते. सामान्यत: ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे घडणारे भूकंप हे मर्यादित क्षेत्र व्यापणारे व कमी विध्वंसक असतात.