---Advertisement---

वर्गमित्राकडून मानसिक अन् शारीरिक त्रास, इंजिनिअरिंग विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

---Advertisement---

पुणे : पुण्यात ताथवडे येथे एका 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. संबंधित प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना तिच्या मृत्युमागील धक्कादायक सत्य समजले. वर्गमित्राकडून वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

साहिती कलुगोटाला रेड्डी (वय 20, रा. अक्षरा इलेमेंटा सोसायटी, ताथवडे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रणव राजेंद्र डोंगरे (वय 20, रा. मयूर समृद्धी, आकुर्डी गावठाण) याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा : हृदयद्रावक! एकीकडे बारावीचे पेपर अन् इकडे वडिलांचं निधन, चेतनवर कोसळला दुःखाचा डोंगर

सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासादरम्यान साहितीने आत्महत्येपूर्वी तिच्या मोबाईलमध्ये अनेक व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करून ठेवले होते. तसेच काही महत्त्वाचे पुरावे मित्रांना पाठवून तिच्या मोबाईलचा पासवर्ड आणि ठिकाण सांगितले होते. तिच्या मित्रांनी हा प्रकार तिच्या पालकांना सांगितल्यानंतर पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला. त्यातील रेकॉर्डिंगच्या आधारे पोलिसांनी डोंगरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली.

हेही वाचा : सावधान! जळगावात पुन्हा आढळला जीबीएस रुग्ण, तीन वर्षीय बालक बाधित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरे याने साहितीला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास दिला होता. वारंवार अपमानास्पद वागणूक आणि शिवीगाळ केल्याने ती प्रचंड तणावाखाली होती. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment