---Advertisement---
Jalgaon Crime : ‘कॅफे कॉलेज कट्टा’च्या नावाखाली विद्यार्थ्यांना अश्लील चाळे करण्यास कंपार्टमेंट उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेत रामानंदनगर पोलिसांनी अचानक धाड टाकली. यावेळी पोलिसांना सात जोडपी अश्लील चाळे करताना मिळून आली असून, त्यांच्या पालकांना बोलावून, त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे.
रामानंदनगर पोलिस ठाणे हद्दीतील ‘कॅफे कॉलेज कट्टा’वर पोलिसांनी छापा टाकत गैरप्रकार उघडकीस आणला आहे. या कॅफेत विद्यार्थ्यांना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी कॅफेचालक मुकेश वसंत चव्हाण (वय ३०, रा. रोटवद, ता. जामनेर, सध्या लाडवंजारी मंगल कार्यालय, जळगाव) याच्याविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार येथे प्लायवूडचे कंपार्टमेंट बनवून विद्यार्थ्यांना अनैतिक कृत्यांसाठी प्रोत्साहन दिले जात होते. या माहितीच्या आधारे, गुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अचानक छापा टाकला.
या छाप्यात, सात जोडपी अश्लील चाळे करताना रंगेहाथ सापडली. पोलिसांना सात जोडपी अश्लील चाळे करताना मिळून आली असून, त्यांच्या पालकांना बोलावून, त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे.