अरे तुला ओळखलेच नाही, १९७१ चे विद्यार्थी ५२ वर्षांनी आले एकत्र!

नंदुरबार : अरे तुला ओळखलेच नाही. अरे वा तू अजूनही तसाच दिसतो. काय रे कसा आहेस, अगदी शाळेत शिकत असलेल्या नावाचा उल्लेख करून एकमेकांचा ओळख परिचय करून घेण्यात आला आणि पुन्हा एकदा शालेय जीवनाचा अल्पकालीन अनुभव घेतला चक्क ५२ वर्षांनी. हा अनुभव मिळाला तो डी.आर. विद्यालयातील तत्कालीन विद्यार्थ्यांना आणि आत्ताच्या ज्येष्ठ नागरिकाना.
काही सुखद तर काही दुःखद अशा गोष्टींना आयुष्याच्या उतार वयात तारुण्यवस्थेतील आठवणींना उजाळा दिला तब्बल अर्धशतक म्हणजेच सुमारे ५२ वर्षांनी एकत्र आले सर्व मित्र मैत्रिणी निमित्त होते स्नेह मिलनाचे…. तरुण वयातील आठवणींना उतार वयात दिला उजाळा….
शहरातील डीआर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात १९७१ या वर्षाला अकरावीत शिक्षण घेणाऱ्या मित्र-मैत्रिणींनी एकत्र येत येथील अग्रवाल भवन मध्ये स्नेह मिलन कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात आपल्या महाविद्यालयीन जीवनातील विविध आठवणींना उजाळा देत शिक्षकांच्या व मित्र-मैत्रिणींच्या चांगल्या वाईट अनुभवाचे कथन केले.
यावेळी अकरावीच्या वर्गात शिकविणाऱ्या शिक्षकांना निमंत्रित करण्यात आले होते त्यांच्या यथोचित असा सन्मान करण्यात आला शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले.  शिक्षकांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांप्रती आदर तर विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आदर व प्रेम व्यक्त केले.
कामानिमित्त वेगवेगळ्या गावांना स्थायिक झालेले मित्र मैत्रिणी या कार्यक्रमात आले काहींचे काहींनी आपल्या नोकरी व व्यवसायातून निवृत्ती घेतली तर काही अद्यापही व्यवसाय करीत आहेत प्रत्येकाची सुखदुःख जाणून घेत मोबाईल, व्हाट्सअप चा माध्यमातून एकत्र आले सुमारे ५२ वर्षांनी . यावेळी सुमारे 30 मित्र मैत्रिणी तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते विविध गोष्टींना उजाळा देत स्नेहभोजन करीत, एकत्रित ग्रुप फोटो काढून एकमेकांचा निरोप घेतला. त्यानंतर शाळेला भेट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यावेळी अनेकांचा कंठ दाटून आला होता. कार्यक्रमाला शिक्षक मंगलगिरी गोस्वामी, आर.ओ.मराठे, कमलाकर वाणी, व्ही.बी.शिंपी हे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभाष अग्रवाल, अनिल पाटील, दिलीप वाणी, ॲड. राजेंद्र अभ्यंकर, ॲड विद्युलता अभ्यंकर, महेंद्र रघुवंशी, गोपाल पाटील, वसंत रघुवंशी, सुरेश शिंत्रे, भास्कर माळगी, कांतीलाल शिंदे, सुरेश शेटे, सुरेंद्र राजपूत, अनिल वाणी, वीरेंद्र रघुवंशी, दत्तात्रेय सूर्यवंशी, किशोर रघुवंशी, प्रदीप असोदेकर, विमल चौधरी, राधा पटेल , राजकुमार गांधी यांनी परिश्रम घेतले.