मुक्त विद्यापीठाच्या विभागीय क्रीडा महोत्सवात नवापूर अभ्यास केंद्राचे यश

 नितीनकुमार माळी

नवापूर : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्रातर्फे शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी क्रीडा महोत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापूर येथील अभ्यासकेंद्र 5220A तर्फे विद्यार्थ्यांनी विविध खेळ प्रकारात सहभाग नोंदवला

यात 100 मीटर 200 मीटर 400 मीटर 800 मीटर 1500 मीटर व 5000 मीटर धावणे, गोळा फेक, लांब उडी, बॅडमिंटन, बुद्धिबळ, खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, 4 x 100 मी. रीले इत्यादी खेळ प्रकारांमध्ये सहभाग घेतला. यातून गावित आकाश, गावित रोशन, वसावे पिकेश, गावित रोहित – (खो – खो), गावित अंजली – (खो – खो व 200 मीटर – पहिला) गावित रुकसाना (100 मीटर व 200 मीटर – दुसरा), वसावे यशराज (व्हॉलीबॉल), पठाण इम्रान(व्हॉलीबॉल), गावित गुलाबसिंग (लाँग जंप – पहिला) या विद्यार्थ्यांची केंद्रीय क्रीडा महोत्सवासाठी निवड झाली. 
एकाच वेळेस नऊ विद्यार्थ्यांची केंद्रीय क्रीडा महोत्सवासाठी निवड झाली त्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शिरीषकुमार नाईक, सहसचिव अजय पाटील यांनी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले. अभ्यास केंद्रप्रमुख डॉ. ए. जी. जयस्वाल, केंद्र संयोजक प्रा. युवराज भदाणे, समंत्रक व अभ्यास केंद्रातील कर्मचारी  मीना शहा, प्रा.व्ही.एस.पाटील, अभय पाटील यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.