---Advertisement---
जळगाव : सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची चिन्हे आहेत. श्रावण महिना सुरू झाल्यापासून साखरेच्या दरात वाढ होत असून, मागणी वाढल्याने आणि जागतिक घडामोडींमुळे सण-उत्सवात साखर आणखी महागण्याची चिन्हे आहेत.
सध्या श्रावण महिना सुरू असून, लवकरच गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी असे मोठे सण येत आहेत. या काळात मिठाई आणि इतर गोड पदार्थांसाठी साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे, पुरवठ्यावर दबाव येऊन साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
साखरेच्या दरात वाढ होण्याच्या शक्यतेमुळे काही व्यापारी साठेबाजी करू शकतात, अशी भीती आहे. यामुळे बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊन दरांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. साठेबाजी रोखण्यासाठी शासनाकडून उपाययोजना आवश्यक आहे.
डाळी, तेलाचाही भडका उडणार
केवळ साखर नव्हे, तर डाळी आणि खाद्यतेलाच्या दरातही वाढ होण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी आणि देशातील कमी उत्पादन यामुळे डाळी आणि तेलाच्या किमती वाढू शकतात.