Sujata Saunik : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची वर्णी; १ जुलैला घेणार सूत्रे हाती

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव डॉ. नितीन करीर हे सेनानिवृत्त होत असून, मुख्य सचिवपदी आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागणार असल्याची दोन दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे. त्या 1 जुलै रोजी अधिकृतपणे मुख्य सचिवपदाची सूत्रे हाती घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सुजाता सौनिक या 1987 च्या बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांचे पती मनोज सौनिक यांनी देखील राज्याच्या मुख्य सचिवपदी कार्यभार सांभाळलेला होता. सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागणार असल्याची दोन दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे.

सुजाता सौनिक यांच्याऐवजी महसूल विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमारी (१९८७ बॅच) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल (१९८९ बॅच) यांच्यादेखील नावांची जोरदार चर्चा सुरु होती. पण अखेर सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिव पदी वर्णी लागली आहे.

शिंदे सरकारने सुजाता सौनिक यांची निवड करुन राज्याला स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिल्याचीदेखील चर्चा आता होत आहे. विशेष म्हणजे राज्यात आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीआधी राज्य सरकारने अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक घोषणादेखील केल्या आहेत.