Summer tips for farmers : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून, अंगाची लाही लाही होत आहे. दुसरीकडे मात्र हंगामातील पिके काढणीला असल्याने शेतकरी त्यांच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Summer tips for farmers) त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हात शेती कामे करताना काही काळजी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही शेतकऱ्यांसाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत, चला काय आहेत या टिप्स जाणून घेऊया.
गेल्या अनेक दिवसांपासून सूर्य आग ओकतोय. परिणामी चटकेदार उन्हाच्या गरम वायुलहरी शरीराची लाहीलाही करत असून, तळपत्या सूर्याच्या दाहकतेने नागरिक हैराण झाले आहेत. तसेच उष्माघाताने काही जणांचा मृत्यूही झाल्याचे समोर आले आहे.
दुसरीकडे मात्र हंगामातील पिके काढणीला असल्याने शेतकरी त्यांच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हात शेती कामे करताना काही काळजी घेणे आवश्यक आहे.
भरपूर पाणी न्या
सर्वप्रथम शेतकऱ्यांनी शेतात जाताना भरपूर पिण्याचे पाणी घेऊन जावे. उन्ह्यात काम करताना सतत पाणी प्यावे. तसेच नारळ पाणीदेखील सोबत नेऊ शकतात, जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही.
सुती कपडे घाला
शेतकऱ्यांनी शेती कामे करताना हलक्या रंगाचे सैल आणि सुती कपडे आणि डोक्यावर टोपी वा टॉवेल बांधावा. ज्यामुळे तुम्हाला उन्हाचा त्रास व स्किनदेखील नुकसान होणार नाही.
यावेळेत काम करणे टाळा
शेतकऱ्यांनी सकाळच्या वेळेस शेती कामे करावे, दुपारी 12 ते 3 दरम्यान काम करणे सहसा टाळावे. त्यानंतर सायंकाळी 4 नंतर काम करू शकतात. उन्हात काम करण्याअगोदर हलका आणि पौष्टिक आहार घ्यावा. भरपूर फळांचे आणि भाज्यांचे सेवन करावे. असे केल्यास शरीरातील ऊर्जा टिकून राहील.
त्रास झाल्यास डॉक्टरांशी साधा संपर्क
शेती कामे करताना उन्हाचा अंदाज घेऊनच काम करावे. तरीही आरोग्याची काही समस्या निर्माण झाल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. जेणेकरून त्रास वाढणार नाही.