---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले होते. आज जळगाव, अमळनेर, पाचोरा, बोदवड, यावल, धरणगाव या ६ बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे. यामध्ये जळगाव तालुका बाजार समितीत सर्वसाधारण गटातून मनपा गटनेते सुनील महाजन हे विजयी झाले आहे.
जळगाव व्यापारी गटात सुरुवातीला संदीप पाटील आणि अशोक राठी हे विजयी झाल्याचे सांगण्यात येत होते मात्र त्याठिकाणी फेर मोजणी सुरू झाली आहे. अंदाजे संदीप पाटील यांना ४९८, शशी बियाणी ४९२, अशोक राठी यांना ४७२ मते मिळाली आहेत.
सर्वसाधारण गटातून मनोज दयाराम चौधरी, लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर, सुरेश शामराव पाटील, सुनील सुपडू महाजन, योगराज नामदेव सपकाळे, प्रभाकर गोटू सोनवणे व शामकांत बळीराम सोनवणे हे विजयी झाले आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. सुनील महाजन यांना सर्वाधिक ४६७ मते मिळाली आहेत.