Sunita Duggal : “माझी आई रुग्णालयात आहे, मी महिला आरक्षणाच्या…” नक्की काय म्हणाल्या?

नवी दिल्ली : आज संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणावर चर्चा सुरू आहे. त्यावेळी हरियाणातील सिरसा येथील भाजप खासदार सुनीता दुग्गल यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेत भाग घेतला. हे विधेयक आणण्याची हिंमत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात, असे भाजप खासदार सुनीता दुग्गल म्हणाल्या.

दुग्गल पुढे म्हणाल्या की, “माझी आई देखील रुग्णालयात दाखल आहे, त्यामुळे आज जेव्हा मी महिला आरक्षणाच्या चर्चेत मुद्दे मांडताना माझ्या आईला दिसेल तेव्हा तिला ही वाटेल की, तिची मुलगी महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवते. ”

दरम्यान लोकसभेत शिवसेना खासदार भावना गवळी यांनी महिला आरक्षण विधेयकावर मोदी सरकारचे कौतुक केले. ते म्हणाले की मोदीजींनी महिलांच्या राजकीय भविष्यासाठी बंद कुलुप उघडले आहे. हे विधेयक आणण्याची हिंमत पीएम मोदींशिवाय कुणातही नव्हती.