Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांच्या परतण्याबाबतची चिंता दूर; वाचा काय म्हणाले इस्रो प्रमुख ?

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अंतराळात अडकून पडले आहेत. ते 5 जून रोजी स्टारलाइनर स्पेसक्राफ्टाने अंतराळ स्थानकावर पोहचले होते आणि 13 जूनला परतणार होते. परंतु गेल्या बारा दिवसांपासून त्यांचे अंतराळामधील बिघाड इंजिनिअर दुरुस्त करु शकले नाही. आता त्यांच्याकडे केवळ 27 दिवसांचे इंधन शिल्लक आहे. अशातच इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी त्यांच्या परतण्याबाबतची चिंता दूर केली आहे.

त्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) हे दीर्घकालीन मुक्कामासाठी सुरक्षित आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचा उशीर हा बोईंगच्या स्टारलाईनर क्रू मॉड्यूलच्या क्षमता चाचणीचा एक भाग आहे. सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर त्यांनी दिलासा दिला, कारण परतण्याच्या तारखेत अनेक तांत्रिक अडथळ्यांमुळे विलंब झाला आहे. त्यात जास्त काही धोका नाही. सोमनाथ यांनी सांगितले की, या अडथळ्यांवर मात करून, विल्यम्सने नव्या अंतराळ वाहन चाचणीसाठी पुढाकार घेतला आहे. तिच्या या साहसाचे त्यांनी कौतुक केले.

सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात
59 वर्षीय सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात गेली आहे. यापूर्वी 2006 आणि 2012 मध्ये त्या अंतराळात गेल्या होत्या. नासाने दिलेल्या माहितीनुसार. सुनीता एकूण 322 दिवस अंतराळात राहिल्या आहेत. 2006 मध्ये 195 दिवस तर 2012 मध्ये 127 दिवस सुनीता अंतराळात राहिल्या होत्या. 2012 मध्ये सुनीताने तीन वेळा स्पेस वॉक केली होती. स्पेस वॉक दरम्यान अंतराळवीर स्पेश स्टेशनमधून बाहेर येतात. सुनीता विल्यम्स अंतराळत जाणारी भारतीय वंशाची दुसरी महिला आहे. तिच्यापूर्वी कल्पना चावला अंतराळात गेली होती.