---Advertisement---

Sunita Williams : अंतराळातून पृथ्वीवर पाठवली आनंदाची बातमी; पाहा काय म्हणाल्या ?

---Advertisement---

भारतीय वंशाची सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर हे नासाचे दोन अंतराळवीर अनेक आठवड्यांपासून अवकाशात अडकले आहेत. त्यांना पृथ्वीवर सुरक्षित आणणं अजूनही शक्य झालेलं नाहीय. त्यामुळे सर्वचजण चिंतेत आहेत. अशातच सुनीता विल्यम्स यांनी नासाच्या लाईव्ह कॉन्फरन्समध्ये पृथ्वीवर परत येण्याबाबत आशावाद व्यक्त केला आहे.

अपयशी होण्याचा प्रश्नच
सुनीता विलियम्स आणि बॅरी विल्मोरने बोइंग स्टारलायनर कॅप्सूल त्यांना पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित घेऊन येईल असा विश्वास व्यक्त केला. अपयशी होण्याचा प्रश्नच नाही असं विल्मोर म्हणाले. परतण्यासाठी NASA आणि बोइंगकडून पृथ्वीवर सुरु असलेल्या थ्रस्टर चाचण्या महत्त्वाच्या आहेत, असं विल्मोर म्हणाले.

NASA ने काही दिवसांपूर्वी बोइंग स्टारलाइनर या अंतराळयानाचे अवकाशातील वास्तव्य 45 ते 90 दिवसांनी वाढवण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर सुनीतांचा हा संदेश आला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) एक महिनाहून अधिक काळ वास्तव्य केल्यानंतर ही पहिलीच वेळ सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांना थेट प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

या अंतराळ प्रवासादरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्या असल्या तरी “अपयश हा पर्याय नाही” असे स्पष्ट करत अंतराळवीर बुच विल्मोर यांनी अंतराळ स्थानकावर थांबण्यामागील हेतू फक्त अंतराळयानाची चाचणी घेणे हाच असल्याचे सांगितले. बुच विल्मोर आणि सुनीता विलियम्स यांना 5 जून रोजी फ्लोरिडातून स्टारलाइनर या अंतराळयानाद्वारे अंतराळात पाठवण्यात आले होते. त्यानंतर ते दुसऱ्याच दिवशी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी यशस्वीरीत्या जोडले गेले.

लाईव्ह सेशनमध्ये सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थांकडून विचारले गेलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि लाईव्हद्वारे अवकाशातील स्थिती बद्दल संपूर्ण जगाशी संवाद साधला तसेच या मिशन मधून अजून बरेच काही चांगले साध्य होणार आहे अशी आशाही दाखवली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment