तरुण भारत लाईव्ह । १४ मार्च २०२३ । मार्च महिन्याच्या आठवड्यात सूर्य बुध मंगळ आणि शुक्र राशी परिवर्तन करणार आहेत. यापैकी रवी म्हणजेच सूर्य कुंभ राशीतून १५ मार्च रोजी मीन राशिमध्ये प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या मीन राशीतील संक्रमणाला संक्रांति म्हटले जाते. सूर्य सुमारे महिनाभर मीन राशीत असेल एप्रिल महिन्यात सूर्य मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत प्रवेश करेल. सूर्य बुध आणि गुरूचा त्रिकोण योग जुळून येत आहे. अशा परिस्थितीत सूर्याचे संक्रमण पाच राशीच्या लोकांना यश आणि आर्थिक लाभ मिळेल. तर कोणत्या आहेत त्या पाच राशी जाणून घेऊया तरुण भारतच्या माध्यमातून.
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांना या काळात मालमत्ता किंवा वाहन लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो दाम्पत्य जीवन सुखकारक होऊ शकते आनंदाची बातमी मिळू शकते
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांना या काळात करिअरमध्ये प्रसिद्ध मिळेल. स्वतःला सिद्ध करण्यास सक्षम असाल तशी संधी मिळू शकते. व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे. विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळेल.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांना संक्रांति अनुकूल ठरू शकेल. वडिलांकडून सहकार्य मिळेल. तीर्थयात्रेला जाण्याचा विचारही करू शकतात कामाच्या ठिकाणी हितक्षत्रूंच्या कार्यवाही ठरू शकते हा काळ चांगला राहू शकेल.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांना हा काळ फलदायी ठरू शकेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहू शकेल मोठे यश मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत बदल करायचा असेल तर ही इच्छा पूर्ण होऊ शकते.
मीन रास
मीन राशीच्या लोकांना या काळात सरकारी कामात यश मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी ही वेळ खूप सकारात्मक असेल. नोकरीत बढती मिळण्याचे योग आहेत.