नंदुरबार : येथील जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांची पुणे येथील गुन्हे अन्वेषण शाखेत पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. नंदुरबार जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून श्रवण दत्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे सहसचिव यांनी आज बदलीचे आदेश पारित केले आहेत. त्यात नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांची पुणे येथील जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस अधीक्षक पदी बदली करण्यात आले आहे. त्यांच्या जागी श्रवण दत्त यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तरुण अधिकारी आहेत. आज आदेश प्राप्त झाल्यानंतर नवीन पोलीस अधीक्षक श्री दत्त हे उद्या नंदुरबार येथे येण्याची शक्यता आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलात पोलीस खात्यासोबतच कायदा सुव्यवस्था राखत असताना खाकीतील माणुसकी चे दर्शन विविध उपक्रम व कार्यक्रमांच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर . पाटील यांनी घडवले आहे. कोरोना काळातील पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांवर आलेल्या दुर्दैवी संकटात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मदत करणे असो की त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सुविधेसाठी सहकार्य करणे असो, गोरगरिबांसाठी चे विविध धातुत्वाचे कार्य स्वच्छता अभियान असेल, वृक्षारोपण असेल यासारखे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला होता.
श्री पाटील बालविवाह रोखण्यासाठी राबवलेली अक्षता मोहीम, नशा मुक्त जिल्हा, गरिबांसाठी केलेली मदत, पोलीस विभागातील शिस्त, निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न, पोलीस ठाण्यांची डिजिटललायझेशन अशी अनेक कामे त्यांनी आपल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात केले.
नंदुरबार हे अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळखले जात असताना सामाजिक सलोख्याचे उपक्रम राबवून त्यांनी किरकोळ वाद वगळता मोठे वाद होऊ न देण्यात ते यशस्वी ठरले.