नवी दिल्ली : सुप्रिम कोर्टाला आज ५ नवे जज मिळाले. त्यामध्ये चीफ न्यायमूर्ती पंकज मिथल, न्यायमूर्ती संजय करोल, न्यायमूर्ती पीवी संजय कुमार, न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या समावेश आहे. त्यांना चीफ जस्टिस ऑफ इंडिया डीवाई चंद्रचूड यांनी शपथ दिली. सुप्रिम कोर्टाच्या कॉलेजियमने मागच्या वर्षी १३ डिसेंबरला या जजेसच नाव मंजूरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवले होते.
न्यायमूर्ती पंकज मिथल यांना ऑक्टोबरमध्ये राजस्थान हायकोर्टात मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केलं. त्या आधी ते जम्मू-काश्मीर आणि लडाख हायकोर्टात चीफ जस्टिस होते. १९८५ मध्ये बार काउंसिल ऑफ उत्तर प्रदेशात होते. ते अलाहबाद हायकोर्टाचेही न्यायाधीश होते. त्यांनी १९८२मध्ये अलाहबाद विद्यापीठातून पदवी घेतली आणि मेरठ कॉलेजमधून लॉची पदवी घेतली आहे.
न्यायमूर्ती संजय करोल हे पटना हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आहेत. ते २०१९ पासून या पदावर आहेत. त्याआधी त्रिपुरा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यापूर्वी हिमाचल प्रदेश हायकोर्टात कार्यवाहक चीफ जस्टिस होते. त्यांचा जन्म १९६१ मध्ये शिमला इथे झाला असून एडवर्ड स्कूलमधून शिक्षण झालं आहे. हिमाचल प्रदेश विद्यापीठातून लॉ ची डिग्री घेतली आहे. संविधान, टॅक्सेशन, कॉर्पोरेट, क्रिमीनल आणि सिव्हील केसेसमध्ये एक्स्पर्टी आहे.
न्यायाधीश पी वी संजय कुमार पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात न्यायधीश होते. त्याआधी आंध्र प्रदेश हायकेर्टात न्यायाधीश होते. १९८८ मध्ये ते आंध्रच्या बार काउंसिलचे मेंबर होते. हैद्राबादच्या निजाम कॉलेजमध्ये सुरुवातीचं शिक्षण घेतलं. कॉमर्स ग्रॅज्युएशननंतर १९८८मध्ये दिल्ली विश्वविद्यालयातून लॉ ची डिग्री घेतली. त्याच वर्षी ते बार काउंसिलमध्येही सहभागी झाले. त्यांनी २००० ते २००३ दरम्यान आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम केलं. २००८ मध्ये तेलंगना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायधीश म्हणून पदोन्नती मिळाली.
न्यायाधीश अहसानुद्दीन अमानुल्लाह पटना हायकोर्टाचे न्यायाधीश आहेत. २०११ मध्ये ते जॉइन झाले होते. इथून त्यांची बदली आंध्र प्रदेश हायकोर्टात झाली होती. जून २०२२ मध्ये परत पटना हायकोर्टात पाठवलं गेलं. ते १९९१ मध्ये बिहार स्टेट बार काउंसिलमध्ये सहाभागी झाले होते. ते मूळचे बिहारचे असून पटना लॉ कॉलेजमध्ये शिकले आहेत.
न्यायाधीश मनोज मिश्रा हे अलाहबादच्या हायकोर्टात २०११ ला शपथ घेतली. तिथं ते दिवाणी, राजस्व, फौजदारी आणि संवैधानिक क्षेत्रात प्रॅक्टिस त्यांनी केली आहे.