Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळेंचं निलंबन; बारामतीत साधा निषेध नाही!

Supriya sule : संसदेची सुरक्षा भेदून लोकसभेत दोन युवकांनी घुसखोरी केली होती. विरोधी पक्षांच्या खासदारांनी या मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाची मागणी केली मात्र सरकारकडून ती मान्य केली जात नसल्यानं आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांच्या खासदारांवर लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये आतापर्यंत तब्बल लोकसभेसह राज्यसभेतून विरोधकांचे १४१ खासदार निलंबित करण्यात आलेय. यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या देखील समावेश आहे.

सुप्रिया सुळे यांचे लोकसभेत निलंबन झाल्यानंतर इंदापूर, नारायणगाव आणि इतर काही ठिकाणी निषेध होत असताना बारामती या सुळे यांच्या ’होम ग्राउंड’वर राष्ट्रवादीच्या त्यांच्या गटाकडून ना निदर्शने झाली, ना आंदोलन. बारामती जिल्ह्यात अन्य तालुक्यांत याप्रकरणी तीव्र निषेध व्यक्त केला जात असताना बारामतीत साधे निषेधाचे पत्रही निघाले नाही.

पक्षफुटीनंतर बारामतीत काही अपवाद वगळता सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे आहेत. काही ठरावीक पदाधिकार्‍यांच्या भरवशावर सुळे येथे आहेत, त्याचा परिणाम मंगळवार, १९ रोजी दिसून आला.