सूरज चव्हाणच्या बिग बॉस मराठी सीजन 5 मधील विजयाने त्याला फक्त लोकप्रियतेच्या शिखरावरच पोहोचवले नाही, तर त्याचे साधेपण आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्वही लोकांच्या मनात घर करून गेले.
बारामतीसारख्या ग्रामीण भागातून येऊन सूरजने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. बिग बॉसचा विजय मिळवल्यानंतर सूरजने राजकारणातील दिग्गज नेते अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
या भेटीत सूरजने आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. ही घोषणा त्याच्या पुढील वाटचालीसाठी एक टर्निंग पॉइंट ठरेल अशी शक्यता आहे.सूरज चव्हाणच्या पुढील निर्णयांबाबत त्याचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करण्याच्या दिशेने त्याने पाऊल उचलल्यास, तो नक्कीच नव्या उंचीवर पोहोचेल, अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.
सूरजने अजित दादांसाठी खास भेट आणली आणि त्यांच्याशी सुसंवाद साधला. अजित पवारांनी सूरजच्या घराविषयी विचारपूस करून त्याला पुढील नऊ महिन्यांत घर पूर्ण होईल, असे आश्वासन दिले.
दादा देव माणूस
‘सुरजच्या भावना त्यांच्या शब्दांत स्पष्ट दिसतात. “दादा देव माणूस आहेत,” असे सूरजने अभिमानाने सांगितले. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी तो खूप दिवसांपासून उत्सुक होता. भेटीमध्ये पवारांनी घर बांधणाऱ्या कंत्राटदाराला फोन करून कामाला गती देण्याचे निर्देश दिले, यामुळे सूरजला मोठा दिलासा मिळाला. अजित पवारांचा लोकांशी थेट संवाद आणि त्वरित निर्णयक्षमता यांचा आणखी एक नमुना या भेटीतून दिसून आला.
काय आहे घोषणा
सूरज म्हणाला की, माझी मोठमोठी काम सुरू आहेत, आता झापूक झुपूक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, तेव्हा भेटूच आपण, असं खुद्द सूरजनेच सांगितलं. त्यामुळे ही घोषणा त्याच्या पुढील वाटचालीसाठी एक टर्निंग पॉइंट ठरेल अशी शक्यता आहे.