टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२० चा कर्णधार

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवला T20 कर्णधार बनवण्यात आले आहे. विशेष म्हणजे हार्दिक पांड्या आता T20 संघाचा उपकर्णधारही नाही. त्याच्या जागी शुभमन गिलकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. शुभमन गिलला वनडे संघाचा उपकर्णधारही बनवण्यात आले आहे. एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्मा जबाबदारी स्वीकारणार आहे. विराट कोहली एकदिवसीय मालिकेतही दिसणार आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाची ही पहिलीच मालिका असेल.

भारतीय T20 संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

भारतीय एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रायन पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.