नांदेड : शिवसेनेत फूट पडल्यानंतर रोजच कुणा ना कुणावर टीका केली जात आहे. दरम्यान, रत्नागिरीतील खेडमध्ये झालेल्या सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी जोरदार भाषण केलं. मात्र त्यांच्या भाषणाची ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खिल्ली उडवली आहे.
कदम काय म्हणाले?
बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यासारख्या वाघाला पाळलं होतं. तुम्ही शेळ्या मेंढ्यांना सांभाळता हा तुमच्यात आणि बाळासाहेबांमध्ये फरक आहे, असं रामदास कदम म्हणाले होते.
अंधारेंनी खरपूस उडवली खिल्ली
त्यांच्या याच विधानाची सुषमा अंधारे यांनी खरपूस खिल्ली उडवली आहे. वाघाला पाळत नसतात. कुत्री, मांजरं पाळत असतात, असा खोचक टीका सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर केली आहे. मुखेड येथे महाप्रबोधन यात्रेला त्या संबोधित करत होत्या.
वाघ पाळत नसतात. तर कुत्रे, मांजरं पाळतात, असा टोला लगावतानाच रामदास कदम यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवली. त्याचे अर्थ त्यांना कळाले नाही. वाघ कधी रडत नाही. इतकी संकट आली पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कधी रडले नाहीत. मग स्वत:ला ढाण्या वाघ म्हणवून घेणारे रामदास भाई का रडत आहेत? असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला.