नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून लोकसभेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणार्या विरोधकांवर निलंबनास्त्र चालले. या कारवाईने सरकार आणि विरोधकांमधील तणाव टोकाला पोहोचला आहे. निलंबित खासदारांची संख्या 141 झाली असून, संसदेच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. या निलंबन कारवाईच्या निषेधार्थ विरोधकांनी आज गुरुवार, २१ रोजी दिल्लीत मोर्चा काढलाय.