---Advertisement---

पत्नीशी अनैतिक संबंधचा संशय; जमावाने घरात घुसून केली तोडफोड

---Advertisement---

नंदुरबार : अनैतिक संबंधाच्या वादातून जमावाने घरात घुसून तोडफोड केल्याची घटना नंदुरबारमधील कंजरवाडा परिसरात १४ जून रोजी घडली. या प्रकरणी जमावाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनुसार, कंजरवाडा भागात राहणारे सचिन किशोर भाट यांचे आकाश गणेश रायचंदे यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन जमावाने सचिन भाट यांच्या घरात तोडफोड करण्यात आली.

कंजरवाडा परिसरात असलेल्या भाट यांच्या घराचे कुलूप तोडून जमावाने घरात प्रवेश केला. घरातील हॉल, बेडरूम, किचनमधील सर्व सामानाची तोडफोड केली. सचिन भाट हे घरी आल्यावर त्यांना तोडफोडीची घटना समजली.

त्यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिल्याने आकाश गणेश रायचंदे, गोविंदा गणेश रायचंदे, भिकान गणेश रायचंदे, सनी राजेश रायचंदे, सोन्या राजेश रायचंदे, गौरव अजय रायचंदे, संतोष गणेश रायचंदे, राजेश नथ्थू रायचंदे (सर्व रा. जाखाणीनगर, सिंधी कॉलनी, जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment