अभिनेता ‘आदित्य सिंह राजपूतचा’ संशयास्पद मृत्यू, बाथरुममध्ये आढळला मृतदेह

तरुण भारत लाईव्ह । २२ मे २०२३। मनोरंजन क्षेत्रातुन धक्कादायक बातमी समोर आली आहे. टी.व्ही मालिका,सिनेमा आणि जाहिरातीत दिसलेला अभिनेता आणि मॉडेल आदित्य सिंह राजपूत याचं निधन झालं आहे. आदित्य सिंग राजपूत केवळ ३२ वर्षांचा होता आणि त्यानं आपल्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली होती.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, तो मुंबईत अंधेरीमध्ये इमारतीत ११ व्या मजल्यावर राहत होता. आदित्यच्या दोन मित्रांना त्याचा मृतदेह बाथरुममध्ये मिळाला. त्यानंतर त्या दोघांनी वॉचमेनला मदतीला बोलावलं आणि आदित्यला तातडीनं रुग्णालयात नेलं. पण आदित्यने तोपर्यंत या जगाचा निरोप घेतला होता. सूत्रांच्या माहितीनुसार बोललं जात आहे की त्याचा मृत्यू हा ड्रग्सचं सेवन अधिक केल्यानं झाला आहे.

आदित्य टी.व्हीवरची प्रसिद्ध मालिका ‘सीआयडी’च्या काही भागांमध्ये नजरेस पडला होता. याव्यतिरिक्त त्यानं ‘मैने गांधी को नहीं मारा’ ,’क्रांतीवीर’,’यू,मी और हम’ सारख्या सिनेमात काम केलं होतं. आदित्य सोशल मीडियावर भलताच सक्रिय होता. इन्स्टाग्रामवर त्याचे ५ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तो तिथे नेहमी आपले फोटो,रील,व्हिडीओ शेअर करायचा.