नंदुरबार : युवकमित्र परिवार महाराष्ट्र राज्य, पुणे संस्थेतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय ‘स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा’ पुरस्कार जोशाबा सरकार युवा मंडळच्या सचिव नीलिमा नितीनकुमार माळी यांना देण्यात विविध मान्यवरांच्या हस्ते पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे प्रदान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त मुख्य वनरक्षक नागपूर रंगनाथ नाईकडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष बुक क्लब पुणे चे संचालक अविनाश निमसे,कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी समाज प्रबोधन संस्था आळंदीचे ह भ प प्रल्हाद महाराज डांगे , सद्गुरु सेवा प्रतिष्ठानचे सचिन म्हसे, युवकमित्र परिवाराचे सर्वेसर्वा प्रवीण महाजन नीलिमा माळी हया गेल्या 13 वर्षांपासून श्रमसंस्कार, योग व निसर्गोपचार शिबिराचे आयोजन करीत आले आहेत.
आतापर्यंत त्यांच्या प्रेरणेने २५० पेक्षा जास्त स्वयंसेवकांमार्फत योग शिक्षक तयार करून योगा चा प्रचार आणि प्रसार करीत असतात. युवकांच्या संस्कार तसेच चरित्र घडवण्याच्या चळवळीत त्यांची खूप मोलाची भूमिका आहे. जोशाबा सरकार युवा मंडळ नवापूर परिवाराच्या सहयोगाने बाल, तरुण व महिला सबलीकरण,आरोग्य योग व निसर्गोपचार, क्रीड़ा, शैक्षणिक, सामाजिक, मनोरंजन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वच्छता मोहीम, गरजू व्यक्तिस मदत, सामाजिक विषय, बाल मानसशास्त्र सामाजिक विचारवंत या विषयांवर लिखाण असे विविध प्रकारचे समाजउपयोगी कार्य ते निरंतर करीत असतात. नीलिमा माळी हया कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे मानसशास्त्र विषयातून पी एच डी करत असून,योग आरोग्य शिक्षण व शारीरिक शिक्षण तसेच वैदिक गणित या पुस्तकाच्या लेखिका आहेत. या उल्लेखनीय कार्याबद्दल अश्या युवक आणि युवतींचा सन्मान स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने आम्ही गेल्या पाच वर्षापासून सतत करीत असल्याचे युवकमित्र परिवार चे अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी सांगितले.